नासा, इस्रोसाठी शनिवारी पहिली चाचणी

नासा, इस्रोसाठी शनिवारी पहिली चाचणी

Published on

पुणे, ता. २ : जिल्हा परिषदेचे विद्यार्थी नासा आणि इस्रोला जाणार आहेत, त्यासाठी शनिवारी (ता. ५) परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवला असून, शनिवारी पहिली परीक्षा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो या संस्थांच्या भेटीसाठी पाठविले जाणार आहे. तीन टप्प्यांत होणारी निवड प्रक्रियेतील पहिली परीक्षा शनिवारी होत आहे तर १९ जुलैला ऑनलाइन स्वरूपात परीक्षा होणार आहे. साधारणपणे आयुकाकडून विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे, त्याचा अभ्यासक्रमही आयुकाकडून निश्चित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने यंदा पहिल्यांदाच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. परीक्षेची घोषणा केल्यानंतर १६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

परीक्षेबाबत...
१६,१२१
- परीक्षार्थींची संख्या

१४१
- परीक्षेची केंद्रे

सकाळी ११ ते १२
- परीक्षेची वेळ


प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांची निवड...
सोळा हजार विद्यार्थी हे ऑफलाइन (एमसीक्यू) स्वरूपात परीक्षा देतील. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांची समान संख्या असेल, यावर प्रशासनाचा भर आहे.

तीन टप्प्यात निवड...
- पहिला टप्पा : प्रत्येक तालुक्यात शनिवारी ऑफलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यातून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड होणार.
- दुसरा टप्पा : दुसरी परीक्षा १९ जुलैला ऑनलाइन असेल.
- तिसरा टप्पा : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांसाठी ‘आयुका’मध्ये बोलावले जाईल. त्यांना अंतराळ संशोधन आणि शास्त्रीय माहिती दिल्यानंतर, आयुकामार्फत तोंडी परीक्षा घेतली जाईल.
- अंतिम निवड : अंतिम तोंडी परीक्षेतून ७५ विद्यार्थी निवडले जातील. यामध्ये २५ विद्यार्थी नासा भेटीसाठी तर ५० विद्यार्थी इस्रो भेटीसाठी पाठवले जातील.

जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शनिवारी त्यासाठी पहिली परीक्षा होत आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रोसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शास्त्रविषयक ज्ञान आणि आवड अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल.
- गजानन पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com