अवती भवती
बालेवाडीत कोरियन भाषेवर वक्तृत्व स्पर्धा
पुणे, ता. २ ‘‘कोरियन भाषा शिकल्याने भारतीय विद्यार्थ्यांना संधींची असंख्य दारे उघडतील. भारतातील विविध भागांमध्ये असे कोरियन भाषा शिकण्यासंदर्भातील उपक्रम दोन्ही संस्कृतींना एकत्र आणतील. तसेच विद्यार्थ्यांना कोरिया-आधारित कंपन्यांमध्ये अनेक संधी मिळवून देतील,’’ असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे मुंबईतील मुख्य वाणिज्यदूत यू डोंग-वान यांनी केले. दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित इंडो-कोरियन सेंटर संचालित किंग सेजाँग इन्स्टिट्यूटच्या वतीने बालेवाडी येथे कोरियन भाषेतील वक्तृत्व स्पर्धा यू डोंग-वान यांच्या उपस्थितीत पार पडली. कोरियन भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. याप्रसंगी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ही-ओके, सेजाँग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीव घटक आदी उपस्थित होते.
वसंतराव नाईक यांना अभिवादन
पुणे, ता. २ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराज बंजारा कल्याण समितीच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी रमेश चव्हाण, सुनील राठोड, रविराज राठोड, स्वप्नील चव्हाण, राहुल चव्हाण, निशिकांत चव्हाण, तुषार चव्हाण उपस्थित होते.
‘आयसीएआय’तर्फे विविध उपक्रम
पुणे, ता. २ : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या वतीने ‘सीए फाउंडेशन डे’निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी सारसबाग ते आयसीएआय भवन, बिबवेवाडी अशी वॉकेथॉन झाल्यानंतर आयसीएआय भवन येथे ध्वजवंदन झाले. विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, फराळ वाटप करण्यात आले. विद्यार्थी व सीए सभासदांसाठी रांगोळी, फोटोग्राफी, चित्रकला, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयसीएआय अध्यक्ष सचिन मिणीयार यांच्या नेतृत्वात हे सर्व कार्यक्रम झाले. यावेळी सदस्य अभिषेक धामणे, रेखा धामणकर, राजेश अग्रवाल, उपाध्यक्ष प्रणव आपटे, सचिव नीलेश येवलेकर, खजिनदार नेहा फडके, प्रज्ञा बंब आदी उपस्थित होते.
‘आपलं घर’मध्ये साहित्याचे वाटप
पुणे, ता. २ : डिसेंट फाउंडेशन, आदित्य फीचर्स आणि नळदुर्गमधील ‘आपलं घर’चे माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून ‘आपलं घर’च्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे, जी.एम. जगताप, आदित्य फीचर्सचे सुधीर मोकाशे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोकाशे यांनी ‘आपलं घर’ संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली. संस्थेचे माजी विद्यार्थी बालाजी शिंदे, वर्षाराणी बिराजदार, नितीन मनाळे, महेश मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. उद्धव लांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.