रिक्षात प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य

रिक्षात प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य

Published on

पुणे, ता. २ : रिक्षात प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीशी एका प्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर मंगळवारी (ता. १) घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह माहेरी निघाली होती. त्या रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्याने प्रवास करीत होत्या. या रिक्षामध्ये आणखी एक पुरुष प्रवासी होता. प्रवासादरम्यान त्याने महिलेच्या मुलीशी अश्लील वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आईला हा प्रकार सांगितला. आईने त्या प्रवाशाला जाब विचारला. त्या वेळी त्याने महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरुद्ध अश्लील वर्तन, दमदाटी आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com