कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर ‘रेडिक्सअॅक्ट’ उपचार
पुणे, ता. ३ : मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील अद्ययावत उपचार मिळावे यासाठी जागतिक स्तरावर नावाजलेली प्रगत ‘रेडिक्सअॅक्ट’ उपचार प्रणाली व अत्याधुनिक रेडिएशन थेरपीचे उपचार उपलब्ध आहेत. या प्रगत तंत्रज्ञानामुळे कर्करोगावरील उपचारांमध्ये अधिक अचूकता, सुरक्षितता आणि अनुकूलता आली असून त्यामुळे रुग्णांच्या उपचारात अधिक परिणामकारकता येण्यास मदत झाली आहे.
‘रेडिक्सअॅक्ट’ प्रणाली ही रेडिएशन थेरपीमध्ये रुग्णांच्या निरोगी पेशींना कमीत कमी नुकसान करत अचूक उपचार देते. अंतर्गत स्कॅनरने सुसज्ज असलेली ही प्रणाली संपूर्ण उपचारादरम्यान कर्करोगाचा ट्यूमर अचूकतेने शोधण्यास मदत करत व शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यात सक्षम आहे. ‘रेडिक्सअॅक्ट’ सुरक्षित असून उपचारांचे परिणामही वाढवते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘‘रुग्णांना सर्वांत प्रगत आणि कार्यक्षम उपचार मिळावेत यासाठी जागतिक स्तरावर नावाजलेली रेडिक्सअॅक्ट प्रणाली आणून आम्ही कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार देत आहोत. भारतातील आघाडीच्या कर्करोगावरील उपचारासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल प्रगत, रुग्ण-केंद्रित ऑन्कोलॉजी उपचार करण्यात आघाडीवर आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.