आज रंगणार ‘संतचरित्र कीर्तन महोत्सव’

आज रंगणार ‘संतचरित्र कीर्तन महोत्सव’

Published on

पुणे, ता. ३ : विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येकाला असली, तरी सर्वांनाच आषाढीवारी शक्य होत नाही. अशा भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त संतविचारांचे माहात्म्य जाणून घेता यावे, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि भक्ती-शक्ती व्यासपीठातर्फे संतचरित्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ४) दुपारी चार वाजेपासून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव होणार आहे.
‘सर्किट हाऊस क्रिएशन्स’ यांच्या विशेष सहकार्यातून हा महोत्सव सादर होत आहे. ‘कोहिनूर ग्रुप- अ कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज’, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ आणि ‘हिंदमाता प्रतिष्ठान महिला समूह संघटक’ हे या महोत्सवाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
‘सोनी मराठी’ वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेले अव्वल पाच कीर्तनकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हर्षद महाराज भागवत, सोमनाथ महाराज पाटील, प्रमोद महाराज डुकरे, लक्ष्मण महाराज लटपटे आणि कल्याणी महाराज मोरे या पाच कीर्तनकारांचा समावेश आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत कान्होबा या पाच संतांची चरित्र हे पाचही कीर्तनकार उलगडणार असून प्रत्येक संताचा एक अभंग ते सादर करणार आहेत.

प्रवेशिका येथे उपलब्ध
या कीर्तन महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून, प्रवेशिका मात्र आवश्यक आहे. या प्रवेशिका बुधवार पेठेतील सकाळ कार्यालयात, तसेच ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’च्या सेनापती बापट रस्ता व नवी पेठ शाखेत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणि बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते ११.३० या वेळेत उपलब्ध आहेत.

कीर्तन महोत्सवाविषयी...
कधी : शुक्रवार (ता. ४)
केव्हा : सायंकाळी ४ वाजेपासून
कुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट

संतांच्या विचारांची आणि शिकवणीची आजच्या काळातही नितांत गरज आहे. ‘कोहिनूर ग्रुप’ नेहमीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला जपण्यासाठी कटिबद्ध आहे. या महोत्सवातून लोकांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळेल, याची खात्री वाटते.
- कृष्णकुमार गोयल,
चेअरमन- कोहिनूर ग्रुप

आषाढीवारी हा महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक-आध्यात्मिक ठेवा आहे. आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या या कीर्तन महोत्सवातून समाज प्रबोधनाचे काम होईल आणि पुणेकरांना आध्यात्मिक ऊर्जा मिळेल.
- सुशील जाधव,
विभागीय व्यवस्थापक- ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’

संतांनी नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी कार्य केले आहे. या महोत्सवातून लोकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होईल. तसेच, नव्या पिढीला आपल्या थोर संतांचे कार्य समजावून घेण्याची संधी मिळेल.
- प्रतिभा धंगेकर,
महिला संघटक- हिंदमाता प्रतिष्ठान महिला समूह संघटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com