बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

Published on

पुणे, ता. ३ : बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसाहाय्य मिळावे आणि मराठी भाषा पंधरवडा कालावधी बदलण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबत त्यांना पत्र दिले.
या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते. ‘‘मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना अर्थसाहाय्य केले जात होते. परंतु २०२३ पासून ते बंद आहे. जिथे मराठी भाषा राज्याची आणि संवादाची मुख्य भाषा नाही; तिथे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही योजना तातडीने सुरू करावी,’’ अशी मागणी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
तसेच, राज्य सरकारतर्फे जानेवारीमध्ये मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. मात्र २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च हा कवी विंदा करंदीकर यांचा स्मृतिदिन, हे औचित्य लक्षात घेऊन २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जावा, अशी मागणीही महामंडळाने केली. याबाबतचा ठरावही दिल्लीतील संमेलनात केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com