जुन्या इमारतींचा पुनर्विकास

जुन्या इमारतींचा पुनर्विकास

Published on

पुणे, ता. ३ : यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? व्यवहार्यता अहवाल कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ५ जुलैला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा नोंदणी आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना पुनर्विकास क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, स्थावर संपदा अभिकर्ते यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

बांधकाम क्षेत्रातील करिअरविषयी चर्चासत्र
बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन हा विषय शिकविताना अनेक कौशल्यांचा जसे की प्रात्यक्षिके, बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत कौशल्ये आणि साईटवरील मनुष्यबळाचा योग्य वापर कसा करावा इ.घटकांचा अभाव दिसतो. दुसरीकडे याच कौशल्यात पारंगत अशा उमेदवारांची वाढती मागणी आहे. याविषयीचे शिक्षण व नोकरीची संधी देणारा एक वर्षाचा आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण असलेला अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. हा अभ्यासक्रम व या क्षेत्रातील नवीन करिअर संधींविषयी मार्गदर्शन करणारे विनामूल्य चर्चासत्र ६ जुलैला आयोजिले आहे. चर्चासत्राला क्रेडाईचे उपाध्यक्ष जे. पी. श्रॉफ, शापुरजी पालनजी ग्रुपचे स्ट्रॅटेजी व बिझनेस एक्सलन्स प्रमुख सागर गांधी, ओमान येथील अल करारचे संचालक हेमंत सर्वभोटला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७७२००७५७६२, ७७५८८२५७३७

एफपीसी सीईओ प्रशिक्षण वर्ग
एफपीसींची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी सीईओ पदावर असते. या पार्श्वभूमीवर ११ जुलैपासून पाच दिवसांचे एफपीसी सीईओ प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठासाखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक, तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९१५६०१००६०

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा १३ जुलैला आयोजिली आहे. यात निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com