विनयभंगप्रकरणी क्रीडा शिक्षकाला अटक
पुणे, ता. ४ : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शाळेतील क्रीडा शिक्षकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. मंगेश बोराटे (वय ४०, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत १४ वर्षीय मुलीच्या आईने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोराटे याच्यावर विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचाारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोराटे हा चंदननगर परिसरातील एका शाळेत क्रीडा शिक्षक आहे. त्याने ‘मुलींनी चांगला व्यायाम केला तर त्यांना मुले प्रपोज करतील. तुला कोणी मित्र आहे का?, तसेच मुली हसल्यानंतर मुलांची धडकन वाढते’, असे मुलीला म्हणाला होता. वर्गात असे प्रश्न विचारल्याने मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली, असे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.