चंदुकाका सराफ ज्वेलर्सचा मंगळसूत्र महोत्सव
पुणे, ता. ५ : चंदुकाका सराफ ज्वेलर्सतर्फे ‘प्रत्येक मंगळसूत्र सांगते एका प्रेमाची गोष्ट’ या संकल्पनेवर आधारित ‘मंगळसूत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ ऑगस्टपर्यंत सर्व शाखांत नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक दागिन्याच्या खरेदीवर घर सजविण्यासाठी आकर्षक भेटवस्तूही ग्राहकांना मिळणार आहेत.
चंदुकाका सराफ ज्वेलर्सने परंपरा आणि स्टाइलच्या अनोख्या संगमाची सांगड घालून मंगळसूत्राचे नवे कलेक्शन आणले आहे. यामध्ये ट्रॅडिशनल लुक बरोबरच ट्रेंडी, हलके-फुलके आणि स्टायलिश मंगळसूत्रांचे असंख्य प्रकार जसे की, डेली वेअर, सिंगल चेन, डायमंड पेंडंट मंगळसूत्रे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच मंगळसूत्र परंपरेला ट्रेंडमध्ये गुंफले असून निवडक आणि आकर्षक मंगळसूत्राच्या ५०० हून अधिक गोल्ड आणि डायमंड वैविध्यासह सादर झाले आहेत. बदलत्या काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईनमध्येही विविधता येथे आहे.
शहरातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली या शाखांमध्ये तसेच राज्यातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या शाखांमध्ये हा मंगळसूत्र महोत्सव सुरू असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.