आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
पुणे, ता. ६ : मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय कार्यशाळा ११, १२ व १३ जुलैला आयोजिली आहे. यात अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी व किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
एफपीसी सीईओ प्रशिक्षण वर्ग
एफपीसींची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी सीईओ पदावर असते. या पार्श्वभूमीवर ११ जुलैपासून पाच दिवसांचे एफपीसी सीईओ प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, करप्रणाली या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक, तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९१५६०१००६०
अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यातीच्यादृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीन दिवसीय प्रशिक्षण १२, १३ व १४ जुलैला आयोजिले आहे. यात उद्योग व स्टार्टअप स्थापना, ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, निर्यात उद्योगातील संधी, शासकीय योजना, अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्जे व अनुदान इत्यादी बाबींवर मार्गदर्शन तसेच लहान, मध्यम व मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष भेट, फळे, लोणचे व मसाले यांचे अन्न प्रक्रिया प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १२ जुलैपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. यात एक्झीम धोरण, इन्को टर्मस, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजनांवर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.