पोल्ट्रीमधील कचऱ्याचे अनोखे व्यवस्थापन

पोल्ट्रीमधील कचऱ्याचे अनोखे व्यवस्थापन

Published on

पुणे, ता. ९ ः पोल्ट्री फार्मिंगमध्ये सतत होणाऱ्या कोंबड्यांच्या विष्ठेमुळे तेथील बिछान्याच्या साहित्यावर एक थर तयार होतो. त्यात प्रमुख्याने मूत्र, विष्ठा आणि भाताचे तूस, लाकडाची भुकटी यांचा समावेश असतो. या पदार्थांच्या मिश्रणातून अमोनिया तयार होतो व त्याचा कोंबड्यांच्या वाढीवर थेट परिणाम होतो. त्यातून काही वेळा कोंबड्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे हे फार्म व्यवस्थापन आणि नफ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले शंकर जगदाळे यांनी २०१८ मध्ये ‘पक्षिमित्र’ या स्टार्टअपची स्थापना केली. स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी जगदाळे हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांत कार्यरत होते. कुक्कुटपालन व्यवसायात आतापर्यंत ऑटोमेशनचे प्रमाण असले तरी पोल्ट्रीतील कचरा (लिटर) व्यवस्थापनासाठी भारतीय शेतकऱ्यांनी स्वीकारावे असे ऑटोमेशन पूर्वी नव्हते. त्यामुळे ‘लिटर’ व्यवस्थापनापासून अनेक बाबी शेतकऱ्यांना या प्रत्यक्ष हाताने कराव्यात लागतात. ही बाब लक्षात घेऊन या मशिनची निर्मिती करण्यात आली आहे.

‘नेट झिरो पोल्ट्री फार्म’ संकल्पना
आयओटी व ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘नेट झिरो पोल्ट्री फार्म’ ही संकल्पना विकसित केली आहे. यामध्ये फार्म, लिटर व्यवस्थापन आणि ऊर्जेची स्वयंपूर्णता ही तत्त्वे महत्त्वाची आहेत. कुक्कुटपालनाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल तर पक्षी जास्त खातात आणि त्यातून त्याचे वजन वाढते. याचा फायदा थेट उत्पन्नासाठी होत असतो. रेकिंग मशिनमुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होते. अमोनिया स्तर कमी होतो आणि वाळणारा परिसर स्वच्छ राहतो. रेकिंग मशिन आत्तापर्यंत देशातील १९ राज्यांमध्ये आणि सहा देशांमध्ये वापरण्यात येत आहे. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी चालू शकेल अशी त्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे जगदाळे यांनी सांगितले.

महत्त्वाचे
- शेतकरी सहसा ‘लिटर’ व्यवस्थापनासाठी पारंपरिक हातसाधनांचा वापर करतात. मात्र, यासाठी खूप शारीरिक मेहनत आणि वेळ लागतो. ज्याचा थेट परिणाम उत्पादन क्षमतेवर आणि नफ्यावर होतो.
- कुक्कुटपालनात शेतकऱ्यांचा होणारा हा खर्च वाचवत त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यात ‘पक्षिमित्र’ने मोठा हातभार लावला आहे.
- कुक्कुटपालनामध्ये तयार होणाऱ्या लिटरचे अत्यंत गतीने विलगीकरण करून त्यातून शेतकऱ्यांचे कष्ट वाचविण्याचे यंत्र (रेकिंग मशिन) या स्टार्टअपने तयार केले आहे.
- त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून आले आहे.
- या स्टार्टअपला पेटंटदेखील मिळाले आहे.
- या स्टार्टअपने कुक्कुटपालनातील कचरा व्यवस्थापनासाठी आणखी दोन मशिन तयार केल्या असून, त्यातील एकाला आंतरराष्ट्रीय (यूएसए) आणि तर एकाला भारतीय पेटंट मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com