पुणे
गुरुपौर्णिमेनिमित्त आज ‘कृष्णार्पण’ संगीत मैफील
पुणे, ता. ११ ः गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कलांगण, मुंबई’ या संस्थेतर्फे शनिवारी (ता. १२) ‘कृष्णार्पण’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव यांच्या स्वररचनांचे विविध रंग या मैफिलीत उलगडणार आहेत. शुक्रवार पेठेतील भारत गायन समाज येथे सायंकाळी सहा वाजता ही मैफील होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन गायिका-संगीतकार वर्षा भावे यांचे आहे. पुण्यातील बाल आणि युवा गायक-वादक या मैफिलीत सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.