डॉ. आशुतोष जावडेकर यांना ‘काव्य प्रतिभा पुरस्कार’

डॉ. आशुतोष जावडेकर यांना ‘काव्य प्रतिभा पुरस्कार’

Published on

पुणे, ता. ११ ः संगत-संगत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘काव्य प्रतिभा पुरस्कार’ यंदा कवी, लेखक, गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांना जाहीर झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते रविवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवनात होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. राजा दीक्षित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निर्मितिमंथन कविसंमेलन होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com