आज पुण्यात १२ जुलै २०२५ शनिवार
आज पुण्यात १२ जुलै २०२५ शनिवार
...........
सकाळी ः
सत्कार समारंभ ः सुसंगत फाउंडेशन आयोजित ः दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ः अध्यक्ष- डॉ. रामदास चवरे ः प्रमुख पाहुणे- बिरुबा शिंपले ः वीर बाजी पासलकर हॉल, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रस्ता ः९.३०.
सत्कार समारंभ ः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी आयोजित ः केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०२४ मधील यशस्वितांचा राष्ट्रीय सत्कार सोहळा ः उपस्थिती- स्नेहलता श्रीवास्तव, विवेक फणसाळकर, ए. एस. राजन ः अध्यक्ष- डॉ. विश्वनाथ कराड ः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृह, कोथरूड ः ९.३०.
पुरस्कार वितरण ः कै. वसंतराव चव्हाण यांना अभिवादन व विविध मान्यवरांना स्व. वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार ः हस्ते- मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, उल्हास पवार, शेरसिंग डागोर, शाम खोडे ः सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, लोहियानगर ः ११.००.
प्रदर्शन ः देशभरातील हातमाग आणि वीण कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे, साड्या, शाली, कार्पेटचा समावेश असलेले ‘दस्तकारी हाट’ प्रदर्शन ः हर्षल बँकवेट हॉल, कर्वे रस्ता ः ११.००.
सायकल वाटप ः शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे व निरामय संस्थेतर्फे ः शालेय ११५ विद्यार्थिनींना सायकल वाटप ः उपस्थिती- माधुरी मिसाळ, दत्ता गायकवाड ः लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय आवार ः ११.००.
दुपारी ः
सायंकाळी ः
गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम ः मराठी ग्रंथालय आयोजित ः गुरुपौर्णिमेला अनुसरून ‘गुरुविण नाही दुजा आधार’ या विषयावर वाचनकट्टा ः सादरकर्ते- महेंद्र वाघ ः पुणे मराठी ग्रंथालय, नारायण पेठ ः ४.३०.
मुक्तसंगीत चर्चासत्र ः गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित ः मुक्तसंगीत चर्चासत्र ः ‘शहनाई’ या विषयावर डॉ. प्रमोद गायकवाड यांचे स-प्रात्यक्षिक व्याख्यान ः संवादिका- शिल्पा देशपांडे ः अध्यक्ष- आनंद माडगुळकर ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.३०.
सत्कार समारंभ ः दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे ः सभासदांच्या पाल्यांना पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार ः हस्ते- राहुल भटेवरा, आशिष दुबे ः चेंबरचे व्यापार भवन, मार्केट यार्ड, गुलटेकडी ः ५.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन यांचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम आणि ‘आरंभ’ आयोजित ः सांगीतिक कार्यक्रम ‘ऋतुगंध’- सहा ऋतूंतील संगीत सौंदर्याचे सादरीकरण ः गायक- शेखर केंदळे, मीनल केळकर, समीर चिटणीस, प्रतिभा देशपांडे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
संवाद ः अक्षय परांजपे यांच्याशी संवाद ः अक्षरधारा बुक गॅलरी, अत्रे सभागृह, बाजीराव रोड ः ६.००.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. सुधीर हसमनीस लिखित ‘सेव्हंटी विस्डम बाइट्स’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- राहुल सहदेव, सुनील लिमये ः सुमंत मुळगावकर सभागृह, एमसीसीआयए टॉवर्स, तळ मजला ः ६.१५.
.................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.