अवती भवती
शाईफेक करणाऱ्यांवर
कारवाईची मागणी
पुणे, ता. १४ : अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे अध्यक्ष युवराज दिसले यांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. महायुती सरकारच्या काळात लोकहितवादी बहुजन नेत्यांचा आवाज बंद करणाऱ्या विघातक शक्ती फोफावत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विघातक प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करवी, अशी मागणीही त्यांनी केली.
.........
वसंतराव चव्हाण
पुरस्कारांचे वितरण
पुणे, ता. १४ : माजी खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाळासाहेब अटल, धनराज बिरदा, सचिन मथुरावाला, करन मकवाणी, रवी परदेशी, संदीप लडकत, सतीश लालबिगे, तसेच विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त नरोत्तम चव्हाण आदी उपस्थित होते. कविराज संघेलिया व कुणाल करोते यांनी सूत्रसंचालन केले.
.............
नरेंद्राचार्यजी महाराज यांचे
मंगळवारपासून मार्गदर्शन
पुणे, ता. १४ ः जगद्गुरुश्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे येत्या मंगळवारी (ता. २२) व बुधवारी (ता. २३) नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या व मार्गदर्शन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा खराडी बायपासजवळील खांदवेनगरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होईल. सोहळ्याच्या दोन्ही दिवशी सकाळी नऊला जगद्गुरुश्रीचे संतपीठावर आगमन आणि आरती होईल. त्यानंतर प्रवचनाला सुरवात होईल. सकाळी अकरानंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळ्यास सुरवात होणार आहे. मार्गदर्शन सोहळा संध्याकाळी पाचपर्यंत असणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्यपीठ नाणिजधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र सहपीठ प्रमुख संजय गाडेकर, सहपीठ प्रमुख अमोल कुलकर्णी व व्यवस्थापक विनायक नाईक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.