उरुळी, फुरसुंगीची पाणी, कचऱ्याची जबाबदारी महापालिकेवरच

उरुळी, फुरसुंगीची पाणी, कचऱ्याची जबाबदारी महापालिकेवरच

Published on

पुणे, ता. १४ ः उरुळी देवाची व फुरसुंगी ही महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्यात आलेली गावे आता टप्प्याटप्प्याने नव्या व्यवस्थेकडे सुपूर्त केली जात आहेत. मात्र, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मूलभूत नागरी सुविधा यांची स्वतंत्र व्यवस्था नगरपरिषद उभारेपर्यंत हे काम महापालिकेकडेच असणार आहे.
पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १४) आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये बहुसंख्य मालमत्तांचे हस्तांतर पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांपैकी या दोन्ही गावांना ११ सप्टेंबर २०२४ रोजी स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नवीन यंत्रणा स्थापन होईपर्यंत दैनंदिन सुविधा खंडित होऊ नयेत म्हणून २३ सप्टेंबर २०२४ रोजी नगरविकास विभागाने महापालिकेलाच तात्पुरती जबाबदारी सोपवली होती. आता ती जबाबदारी नियोजनपूर्वक हस्तांतरित केली जात आहे. दिवटे यांनी सांगितले की, जलप्राधिकरणामार्फत पूर्वीपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची देखभाल सध्या महापालिकाच करत आहे. ‘टीपी स्कीम’ संदर्भातील कागदपत्रांचे हस्तांतरही सुरू असून, स्वच्छता व्यवस्थेचा तात्पुरता भार महापालिकेवरच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com