जमीन गुंतवणुकीबाबत कायदा

जमीन गुंतवणुकीबाबत कायदा

Published on

पुणे, ता. १५ : जमीन खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? महाराष्ट्रातील जमिनीचे व्यवहार आणि कायदेशीर बाबींबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची संधी आहे. १५ वर्षांचा अनुभव असणारे रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक रोहित गायकवाड यांची ‘जमीन गुंतवणूक, घ्यावयाची काळजी आणि कायदा’ ही विशेष दोन तासांची ऑनलाइन कार्यशाळा १८ जुलैला सायंकाळी ६ वाजता आयोजिली आहे. यात ७/१२, फेरफार, टायटल सर्च अहवाल तपासण्यापासून ते रस्त्याचा वापर आणि अतिक्रमणाची शक्यता ओळखण्यापर्यंत महत्त्वाचे मुद्दे शिकायला मिळतील. सुरक्षित आणि कायदेशीर जमीन खरेदीसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८९५६३४४४७१

शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉइड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर २० जुलैला शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शरीर व योगाची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सेंद्रिय खतनिर्मिती व वापर
शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढते, मातीच्या कणांची रचना दाणेदार होते, जमिनीची जलधारणशक्ती वाढते, निचरा चांगला होतो व हवा खेळती राहते. तसेच रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करता येते. रासायनिक खतांच्या किंमतीही वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. म्हणून सेंद्रिय खते तयार करण्यास शिकवणारी व त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २१ जुलैला होणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा, गोआधारित निविष्ठा, नैसर्गिक खत व्यवस्थापन, वनस्पतीपासून तयार करण्यात येणारी जैविक कीटकनाशके तयार करण्याची पद्धत, घरगुती बुरशीनाशके, चंद्र व सूर्याच्या कलेनुसार घेतले जाणारे सेंद्रिय उत्पादन व फवारण्यांचे नियोजन, बायोडायनामिक शेती पद्धती, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा अभ्यास, परमा कल्चर शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन होईल.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com