शिष्यवृत्तीत चमकलेले खानवडी शाळेत

शिष्यवृत्तीत चमकलेले खानवडी शाळेत

Published on

पुणे, ता. १६ ः ग्रामीण भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून गुणवत्ता यादीत झळकत आहेत. याची दखल घेऊन या विद्यार्थ्यांना खानवडीच्या शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. शिवाय या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण मिळणार आहे.
पुरंदर तालुक्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेचे पहिल्यांदाच बारावीपर्यंतचे खानवडी गावात वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ सुरू करण्यात येणार आहे. या शाळेसाठी नुकताच पुणे जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि क्रिस्टल हाउस इंडिया या स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे. या शाळेमध्ये इतर मुलांच्या प्रवेशासोबतच आता शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी आणि आठवीमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मिळणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील दोन्ही वर्गातील मिळून १२५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. इयत्ता पाचवीतील ६८ विद्यार्थी गुणवत्ता यादी आले, त्यापैकी ४७ विद्यार्थी हे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी पुढील वर्षी खानवडी शाळेत प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा अथवा नाही हे ऐच्छिक असणार आहे. मात्र, हे गुणवान विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आणखी प्रयोग करून गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महत्त्वाचे...
शाळेचे नाव ः ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल, खानवडी (ता. पुरंदर)
शालेय स्वरूप ः बालवाडी ते बारावीपर्यंतची निवासी शाळा
अभ्यासक्रम ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम (सीबीएसई)
प्रवेश प्रक्रिया ः शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
सहभाग ः पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन, क्रिस्टल हाउस इंडिया
सुविधा ः मोफत शिक्षण, निवास, भोजन, डिजिटल शिक्षण, करिअर मार्गदर्शन
उद्दिष्ट ः ग्रामीण गुणवंत विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे

यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. खानवडीमध्ये पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर त्या ठिकाणी शिक्षण दिले जाईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com