बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी अभ्यासक्रम
पुणे, ता. १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी पदवी अभ्यासक्रमाच्या ‘अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम’ला (एईडीपी) सुरवात झाली आहे. या अंतर्गत ६० विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी ॲप्रेंटिसशिप दिली जाणार असून त्यासाठी त्यांना दरमहा किमान नऊ हजार रुपये छात्रवृत्ती (स्टायपेंड) मिळणार आहे.
देशातील तरुणांना उद्योगसक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात सशक्त कारकीर्द घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एईडीपी कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता त्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे, त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ घडवून आणणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे तर उद्योगात काम करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची संधी मिळेल. ब्लॉकचेन हे पुढील पाच वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान ठरणार आहे. एईडीपीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, टीमवर्क, आत्मविश्वास आणि व्यावसायिकता येणार आहेत, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी नमूद केले.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन उद्योगातील समस्या समजून घेता येतील, प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांनी शिकलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कामात करता येईल.’’
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि अनुभव मिळवण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात असेच उद्योग संपर्क वृद्धिंगत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या डिजिटल क्रांतीच्या युगात अशा प्रकारचे कौशल्यविकास कार्यक्रम अत्यंत गरजेचे ठरत आहेत. त्यामुळे एईडीपीसारख्या उपक्रमांची निवड विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.