एक विषय निवडून सखोल अभ्यास करा सुशीलकुमार यांचे विद्यार्थ्यांना सल्ला
पुणे, ता. १८ ः ‘‘शिक्षण हे काळानुसार बदलणे गरजेचे आहे. आजच्या काळात जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी मित्रांचे एक जाळे तयार करावे आणि एक विषय निवडून त्यामध्ये सखोल अभ्यास करा,’’ असा सल्ला टाटा टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष सुशील कुमार यांनी दिला.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या ‘आरटीएन’चे संचालक ब्रिगेडियर वीरेश श्रीवास्तव, माजी विद्यार्थी अथर्व राजे, सोहम चव्हाण आदी उपस्थित होते.
श्रीवास्तव म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर यावे. ज्ञान मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञानार्जन करा. अपयश हा यशाचा भाग आहे, अपयशाने खचू नका.’’
कार्यक्रमात डॉ. मुजुमदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फोटोः 32547