‘सीए’च्या अभ्यासक्रमात आता ‘एआय’चा समावेश चरणज्योत सिंग नंदा यांची माहिती
पुणे, ता. १८ ः ‘‘कृत्रिम बुद्धिमतेमुळे (एआय) सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आगामी काळ ‘एआय’चा असून, सनदी लेखापालांना ‘एआय’चे ज्ञान व्हावे, त्याचा चांगला उपयोग करता यावा, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सीए विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश केला जात आहे. त्यामुळे सनदी लेखापाल अधिक तंत्रज्ञानाभिमुख आणि ‘एआय’ प्रशिक्षित होत आहेत,’’ असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे आयोजित ‘एआय इनोव्हेशन समिट २०२५’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नंदा बोलत होते. यावेळी ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी, सचिव सीए डॉ. जयकुमार बत्रा, एआय कमिटीचे अध्यक्ष सीए उमेश शर्मा, उपाध्यक्ष सीए दयानिवास शर्मा, ‘आयसीएआय पुणे’ शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार आदी उपस्थित होते.
नंदा म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग यासारख्या नव्या तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. शिकण्याची आसक्ती हवी. आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘एआय’ प्रशिक्षण वर्ग झाले असून, त्यातून २५ हजार सनदी लेखापाल ‘एआय’ मोड्यूल शिकले आहेत.’’
कार्यक्रमात सीए डॉ. जयकुमार बात्रा यांनी प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके, सीए प्रज्ञा बंब यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिणियार यांनी आभार मानले.
फोटो ः 32561
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.