वडगाव शेरी, वारजे परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू

वडगाव शेरी, वारजे परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू

Published on

पुणे, ता. १९ ः शहरातील काही भागांत घरफोडी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वडगाव शेरी, वारजे, हडपसरमधील मगरपट्टा, तसेच नऱ्हे परिसरात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरला. यातील तीन चोऱ्या ११ ते १८ जुलैदरम्यान घडल्या आहेत.
वडगाव शेरीमधील सोमनाथनगर भागातील एका वसतिगृहात शिरलेल्या चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल असा एक लाख ६८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात बालाजी पीजी हॉस्टेल आहे. शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री चोरटा वसतिगृहात शिरला. वसतिगृहात राहणाऱ्या तरुणाचा लॅपटॉप आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरट्याने पळवला.
वारजे-एनडीए रस्त्यावरील अमृतवेल सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा एक लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी बुधवारी (ता. १६) मध्यरात्री कपाटातील तीन हजारांची रोकड आणि दागिने असा एक लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरला.
हडपसर भागतील मगरपट्टा सिटी परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मगरपट्टा सिटीतील कॉसमॉस सिटी सोसायटीत राहायला आहेत. बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, मनगटी घड्याळ अशा तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरला.
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका सोसायटीमधील सदनिकेतील लॅपटॉप, मोबाईल असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नऱ्हे-धायरी रस्त्यावरील लँड मार्क सोसायटीत तक्रारदार राहायला आहेत. फिर्यादी यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा आत शिरला. लॅपटॉप व मोबाईल चोरून तो पसार झाला. बुधवारी (ता. १६) हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com