पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार पंकज देवरेनी स्वीकारला
‘पीएमपी’ अध्यक्षपदाचा
देवरेंनी पदभार स्वीकारला
पुणे, ता. २१ ः पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार पंकज देवरे यांनी सोमवारी स्वीकारला. सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. दीपा मुधोळ मुंडे यांच्या जागी देवरे यांची नियुक्ती झाली आहे.
पंकज देवरे हे महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी ते लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची ‘आयएएस’साठी पदोन्नती झाली.
पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवरे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यात त्यांनी तीन मुद्यांवर चर्चा करून विभाग प्रमुखांना काही आदेश दिले आहेत. यात पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न हे अडीच कोटी रुपये इतके असावे, सध्या १७८० बस रस्त्यावर धावत आहेत. त्याची संख्या आणखी वाढावी, यासह बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण अत्यंत कमी असावे. या तीन बाबींवर प्रामुख्याने काम करणार असल्याचे देवरे यांनी सांगितले आहे.
फोटोः 33346