गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिकाने सन्मान
पुणे, ता. २३ : शहर श्रीमाली ब्राह्मण समाज व सोमेश्वर वेदपाठशाळेतर्फे दहावी, बारावी आणि पदवीप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम गंजपेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे विवेक वेलणकर व राजेंद्र कश्यप यांच्या हस्ते हेमांगी जोशी, भक्ती दवे, सिद्धी ओझा व अमर वोरा यांना सन्मानित केले. यावेळी समाजातील ८५० हून अधिक पालक उपस्थित होते.
विकास आबनावे पुण्यस्मरण
पुणे : ‘‘डॉ. विकास आबनावे यांनी समाजासाठी जपलेली मूल्ये संस्थेची वाटचाल आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते,’’ असे प्रतिपादन डॉ. विकास आबनावे फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले. डॉ. विकास आबनावे फाउंडेशन आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या प्रांगणात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, खजिनदार व संचालक प्रथमेश आबनावे, संचालक गौरव आबनावे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक जयश्री जाधव यांनी केले. कल्याणी साळुंके मालुसरे यांनी आभार मानले.
गुणवंत आदिवासी विद्यार्थी सत्कार
पुणे : ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयात झोकून द्यावे. कोणतीही शाखा कमी दर्जाची नसून मिळेल त्या शाखेत नोकरीच्या अनेक संधी आहेत. कारण मी कला शाखेतून पदवी घेऊन पुढे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो, असे मत नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पायरा यांनी व्यक्त केले. आदिवासी समाज कृती समितीतर्फे आयोजित गुणवंत आदिवासी विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी आदिवासी समाजातील यशस्वी दहावी, बारावी, पीएचडी, मेडिकल, एमएसडब्लू, संगणक, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील २०० गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. गोविंद गारे यांची पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर डॉ. तुकाराम रोंगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नामदेव गंभिरे यांनी, तर सूत्रसंचालन गंगाराम सांगडे यांनी केले. खेमजी भोईर यांनी आभार मानले.
उपाध्यक्षपदी डॉ. नीरज जाधव
पुणे : डॉ. नीरज जाधव यांची ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस हेल्थ केअर प्रोफेशनल डोमेनसाठी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जाधव हे याआधीपासूनच काँग्रेस आणि पक्षसंघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी पुणे शहर काँग्रेस डॉक्टर सेलच्या कार्याध्यक्षपदी काम केले आहे. तसेच यंग इंडिया के बोल या स्पर्धेद्वारे निवड होऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी ते कार्यरत आहेत. ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस ही सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या व्यावसायिक लोकांची संघटना असून, याद्वारे संघटनेतील विविध धोरणात्मक बाबींमध्ये योगदान देणे शक्य होणार आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.