पुण्‍यातील आरोग्यसेवा विस्‍कळित!

पुण्‍यातील आरोग्यसेवा विस्‍कळित!

Published on

पुणे, ता. २३ : सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत असलेल्‍या पुणे विभागातील आरोग्यसेवा विस्‍कळित झाली आहे. आरोग्‍य उपसंचालक कार्यालय, राज्‍याचे साथरोग विभागाचे कार्यालय, कुटुंब कल्‍याण कार्यालय या ठिकाणी असलेल्‍या महत्त्वाच्या उपसंचालक, अतिरिक्‍त संचालक, सहाय्यक संचालक या पदांवर एकही पूर्णवेळ आरोग्‍य अधिकारी नियुक्‍त केलेले नाहीत. मात्र तेथे अतिरिक्‍त कार्यभार तात्‍पुरत्‍या काळासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक पदभार दिल्‍याने

पुण्‍यात संपूर्ण राज्‍याचा कारभार पाहणारे कुटुंब कल्‍याण व साथरोग विभागाचे स्‍वतंत्र कार्यालये आहेत. कुटुंब कार्यालयाच्‍या अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता व बालआरोग्य, लसीकरण कार्यक्रम, आरोग्य तपासणी व कुटुंब सर्वेक्षण विभागाबरोबर जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम आदी उपक्रम आहेत. या विभागासाठी एक स्‍वतंत्र अतिरिक्‍त संचालक असतो व त्‍याच्‍या अंतर्गत वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळे सहायक संचालक असतात. मात्र, सध्‍या अतिरिक्‍त संचालकपद रिक्‍त असून त्‍या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार डॉ. संदीप सांगळे यांच्‍याकडे दिला आहे. डॉ. सांगळे यांच्‍याकडेच जलजन्‍य आजार, मलेरिया व फायलेरिया तसेच क्षयरोग व कुष्‍ठरोग या कार्यक्रमांच्‍या दोन्‍ही सहसंचालक पदाचाही अतिरिक्‍त कार्यभार दिलेला आहे. याआधी याच कार्यक्रमांचा पदभार डॉ. बबिता कमलापूरकर यांच्‍याकडे होता. आता त्‍यांची नियुक्‍ती आरोग्‍य माहिती व जीवनविषयक आकडेवारी या विभागाच्‍या उपसंचालक पदावर केली आहे.
राज्‍यातील साथरोग विभागांतर्गत एकत्रित रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी), राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जलजन्‍य आजार, साथीचे व विषाणूजन्‍य आजार, क्षयरोग व कुष्‍ठरोग विभाग, मलेरिया व फायलेरिया हे स्‍वतंत्र कार्यक्रम असतात. यापैकी काही कार्यक्रमांना पूर्णवेळ सहसंचालक, उपसंचालक तर काहींना सहायक संचालक असणे आवश्यक आहे. मात्र, त्‍यांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. क्षयरोग व कुष्ठरोग या विभागाच्‍या उपसंचालक पदावर डॉ. राधाकिशन पवार यांची नियुक्‍ती गेल्‍या महिन्‍यात केली आहे. डॉ. पवार हे याआधी पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक होते. तर, त्‍यांच्‍या रिक्‍त झालेल्‍या उपसंचालक पदाचा अतिरिक्‍त कार्यभार हा त्‍याच कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्‍याकडे दिला आहे.

वेळेआधीच बदल्‍या
गेल्‍या महिन्‍यात पुण्‍यातील अनेक आरोग्‍य अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या करण्यात आले आहेत. विशेष म्‍हणजे त्‍यापैकी बहुतांश अधिकाऱ्यांना पदभार देऊन वर्षही झालेले नव्‍हते. त्‍यांना तो विभाग समजतो ना समजतो तेच त्‍यांच्‍या बदल्‍या केल्‍या आहेत.

आरोग्‍य विभागातील वेगवेगळ्या कार्यक्रमांवर पूर्णवेळ अधिकारी देण्‍यात येणार आहेत. येत्‍या १५ ऑगस्‍टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच हे अधिकारी सर्वांसाठी उपलब्‍ध असतील.
- प्रकाश आबिटकर,
आरोग्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com