अर्ली बर्डच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
पुणे, ता. २४ : पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अर्ली बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शाळेत आणि हनुमान टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला. यावेळी प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या मदतीने शाळेतील मैदानावर औषधी वनस्पतीसह इतर जातींच्या रोपांची लागवड केली. त्यानंतर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी हनुमान टेकडीवर झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष आपले मित्र, सुंदर माझा निवारा, दारी वृक्षांचा पसारा आदी घोषणा देत पर्यावरणविषयक जागृतीफेरी काढली. टेकडीवर विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत वड, पिंपळ, कोरफड, नारळ आदी झाडे लावली. यावेळी मुख्याध्यापक रेणू सिंह यांनी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व सांगून झाडे जगवण्याचा आणि वाढविण्याचा संकल्प करण्यास सांगितला. सूत्रसंचालन वैशाली हेंद्रे यांनी केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत तुपे कन्या विद्यालयाचे यश
पुणे, ता. २४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयातील ६५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली. त्यामध्ये सहा विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादी, तर ५९ विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती प्राप्त केली, अशी माहिती प्राचार्य ऊर्मिला पाटील यांनी दिली. यावेळी संस्थेचे विभागीय अध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे, जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, अरविंद तुपे, विभागीय अधिकारी संजय मोहिते, सहाय्यक अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपमुख्याध्यापक आनंदराव करे, पर्यवेक्षक मंदाकिनी शिंदे यांच्यासह शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थिंनींना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.