आज पुण्यात २९ जुलै २०२५ मंगळवार
आज पुण्यात २९ जुलै २०२५ मंगळवार
................................................
सकाळी ः
शि. द. फडणीस महोत्सव ः ‘सुहाना आयोजित ‘शि. द. १००’ महोत्सव ः ‘शब्दांवाचून ... ’ हा देश-विदेशातील शब्दविरहित व्यंगचित्रकलेची ओळख करून देणारा रसग्रहणाचा दृक्-श्राव्य कार्यक्रम ः सादरकर्ते- विवेक प्रभुकेळुस्कर ः ‘शिदं’चा हृद्य नागरी सत्कार सोहळा ः प्रमुख पाहुणे- डॉ. गो. बं. देगलूरकर ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
गौ राष्ट्र यात्रा ः महाराष्ट्र गोसेवा आयोग आयोजित ः गौ राष्ट्र यात्रेचे आगमन आणि स्वागत ः हस्ते- शेखर मुंदडा व अन्य ः महाराष्ट्र गोसेवा आयोग, पशुसंवर्धन आयुक्तालय, खडकी रोड, स्पायसर कॉलेजसमोर, सानेवाडी, औंध ः १.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण ः आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलच्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार ः भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट उद्योजक पुरस्कर ः प्रमुख पाहुणे- सतीश मगर ः पुरस्कारार्थी- अनिकेत लाटकर, उज्ज्वला गोसावी, राजेश कुलकर्णी, सतवीर सिहाग, डॉ. राजेश मणेरीकर ः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, १३१ मयूर कॉलनी, कोथरूड ः ६.००.
स्लाइड शो ः नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, मंजुश्री खर्डेकर व क्रिएटिव्ह फाउंडेशन आयोजित ः जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने डॉ. संग्राम इंदोरे यांचा ‘वाघ’ या विषयावर स्लाइड शो ः अंतरनाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीजवळ, हॉटेल वाडेश्वरशेजारी, कोथरूड ः ६.३०.
पुरस्कार वितरण व शिष्यवृत्ती प्रदान सोहळा ः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. विश्वनाथ कराड यांना, तर श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती डॉ. केदार फाळके यांना प्रदान करणारा सोहळा ः हस्ते- श्री स्वरूपानंद सरस्वती ः अध्यक्ष- रवींद्र वंजारवाडकर ः उपस्थिती- स्थितप्रज्ञानंद सरस्वती, प्रदीप रावत, अमृत पुरंदरे ः यशवंतराव नाट्यगृह, कोथरूड ः ६.३०.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.