‘एलन’चे विद्यार्थी झळकले ‘मन की बात’मध्ये

‘एलन’चे विद्यार्थी झळकले ‘मन की बात’मध्ये

Published on

पुणे, ता. २८ : आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये यश मिळविलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या कोटा येथील देवेश पंकज भैया आणि देबदत्ता प्रियदर्शी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे कौतुक केले. या ऑलिंपियाडमध्ये देवेश याने सुवर्ण, तर देबदत्ता याने रौप्य पदक पटकाविले आहे.
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडच अंतिम फेरी यूएईमध्ये झाली. यात चार विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यातील दोन विद्यार्थी हे एलन इन्स्टिट्यूटचे होते. देवेश हा सध्या इयत्ता बारावीत, तर देबदत्ता हा इयत्ता दहावीत आहे. मोदी म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये देवेश पंकज, संदीप कुची, देबदत्ता प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्येही भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवून आपली ताकद सिद्ध केली.’’ एलन करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कुक्रेजा म्हणाले, ‘‘देशाच्या बुद्धिमत्तेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी एलन इन्स्टिट्यूट झटत आहे. २०२४ पर्यंत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ६९ सुवर्ण, ५४ रौप्य आणि १२ कांस्य पदके जिंकली आहेत.’’

Marathi News Esakal
www.esakal.com