अवती भवती
‘टाऊन हॉल कमिटी’तर्फे
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पुणे, ता. २८ : ‘टाऊन हॉल कमिटी’तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती २०२५-२०२६ या कालावधीतील दहावी उत्तीर्ण होऊन, त्यापुढील कोणत्याही वर्गात, कोणत्याही विद्या शाखेचा शासनमान्य अधिकृत अभ्यासक्रम नियमितपणे पूर्ण करीत असलेल्या किंवा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांना येत्या १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान टाऊन हॉल कमिटी, हिराबाग, ९८९/१ शुक्रवार पेठ येथे विना शुल्क अर्ज करता येणार आहे. जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याबाहेर शिक्षण घेत असतील, त्यांनी स्वतःचे नाव व पूर्ण पत्ता असलेला ५ रुपयांचे पोस्टेज लावलेला योग्य आकाराचा लिफाफा पाठविल्यास अर्जाचा नमुना पोस्टाने पाठविण्यात येईल. अशी माहिती कमिटीचे मानद सचिव डॉ. ए. पी. देशमुख यांनी दिली.
........
श्रीयाळशेठराजाचा उत्सव यंदाही होणार जल्लोषात
पुणे, ता. २८ : औटघटकेचा राजा श्री श्रीयाळशेठराजाचा वार्षिक एकदिवसीय उत्सव श्री श्रीयाळशेठराजा उत्सव ट्रस्ट यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहे. हा उत्सव येत्या बुधवारी (ता. ३०) रास्ता पेठेतील श्रीयाळशेठराजा चौक येथे सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत आयोजित केला आहे. उत्सवाचे ३९१वे वर्ष असून ही परंपरा ओंकार बकरे यांच्या कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्या जतन केली जात आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्र्वस्त पुष्करसिंह पेशवे व रमेश भगवत उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त विकास बकरे यांनी दिली.
.......
लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्सच्या अध्यक्षपदी अॅड. खलाटे
पुणे, ता. २८ : लायन्स क्लब ऑफ पुणे सिनिअर्सच्या अध्यक्षपदी अॅड. घनश्याम खलाटे व सचिवपदी अॅड. भाग्यश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच खजिनदारपदी शुभांगी पाटणकर व उपाध्यक्षपदी नितीन पाटील यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती २०२५-२०२६ या कालावधीसाठी झाली आहे. त्यांचा शपथविधी समारंभ माजी प्रांतपाल राज मुच्छाल यांच्या हस्ते झाला. यावेळी उप प्रांतपाल श्रेयस दीक्षित, शरदचंद्र पाटणकर, शरद पवार सतीश राजहंस, बिपिन शहा, रवी गोलार आदी उपस्थित होते. क्लबतर्फे हिंगणे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या शाळेला २१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.