राज्य सहकारी संघावर ‘सहकार’ पॅनेलची बाजी

राज्य सहकारी संघावर ‘सहकार’ पॅनेलची बाजी

Published on

पुणे, ता. २९ ः महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार’ पॅनेलने बाजी मारली. सहकार पॅनेलकडून २१ जागांपैकी २० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी १९ उमेदवार विजयी झाले. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी नऊ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर १२ संचालकांच्या जागांसाठी निवडणूकीसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये ७०.८ टक्के मतदान झाले. राज्यातील १२ विभागांत एकूण १४ मतदार केंद्रांवर झालेली मतदान झाले होते. निवडणुकीमध्ये जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधीच्या मतदार संघातून धनंजय कदम, संजय पाटील, रामकृष्ण बांगर, विलास महाजन, प्रमोद पिपरे विजयी झाले. विभागीय सहकारी संघ प्रतिनिधीच्या मतदार संघातून अशोक जगताप तर इतर संस्था सभासद प्रतिनिधीच्या मतदार संघातून संजीव कुसाळकर, नंदकुमार काटकर, नितीन बनकर, रामदास मोरे, सुनील जाधव पाटील विजयी झाले आहेत. इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून अर्जुनराव बोरुडे विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्थांचे वैधानिक कार्यक्षेत्रनिहाय जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधीमध्ये पुणे विभागातून साहेबराव हिरामण, मुंबई विभागातून प्रवीण दरेकर, कोकण विभागातून अरुण पानसरे, छत्रपती संभाजीनगरमधून गुलाबराव मगर विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधीमधून विष्णू घुमरे, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून अनिल गजरे, महिला प्रतिनिधीतून जयश्री पांचाळ आणि दीपश्री नलवडे विजयी झाले आहेत. राज्यस्तरीय संघीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीतून प्रकाश दरेकर विजयी झाले असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली.

सहकार विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार
सहकार पॅनेलची निवडणूक विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. निकालानंतर पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले, ‘‘आम्हाला जे यश मिळाले आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. पुढील काळात राज्यात सहकार शिक्षण, प्रशिक्षणाचे अभियान सुरू केले जाणार आहे. चांगल्या संकल्पना घेऊन नवीन संचालक मंडळ काम करेल. सहकार विद्यापीठ गुजरातला गेले असले तरी आपल्याला वेगळे विद्यापीठ किंवा उपकेंद्र करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com