

पुणे, ता. २९ : तत्काळ पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे तत्काळ पासपोर्ट योजने’अंतर्गत पुण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) शनिवारी (ता. २) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत अपॉइंटमेंट्सचे वेळापत्रक खुले करण्यात आले असून पात्र आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असलेले नागरिक या संधीचा लाभ घेऊ शकतात.
तत्काळ पासपोर्ट योजने’त अर्जदाराकडून अधिक कागदपत्रे आणि पात्रतेचे कठोर निकष पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक अर्जदार यापैकी एका किंवा दोन्ही अटींमध्ये अपात्र ठरतात, ज्यामुळे त्यांचे अर्ज यशस्वीरीत्या सादर होत नाहीत. अर्जदारांनी ‘तत्काळ सल्ला’ आणि ‘तत्काळ हमीपत्र’ काळजीपूर्वक वाचून, कागदपत्रांची पूर्तता आणि पात्रता निश्चित करावी, जेणेकरून अपॉइंटमेंटच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे तपशील पासपोर्ट विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचाही आढावा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदारांची सत्यता तपासली जाणार
पासपोर्ट अधिनियम १९६७च्या कलम ५ नुसार, पासपोर्ट प्राधिकरण अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त कागदपत्रे मागवू शकते. त्यामुळे सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे पासपोर्ट प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच खासगी दुकानदारांकडून प्लास्टिकवर छापलेले आधार, पॅन, मतदार ओळखपत्र वगैरे स्मार्ट आयडी म्हणून दिले जाणारे कार्ड्स ग्राह्य धरले जाणार नाहीत. आधार कार्ड हे जन्मतारीख सिद्ध करणारे अधिकृत कागदपत्र नाही, याचीही नोंद घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.