सीएनजी, इलेक्ट्रिकनंतर आता ‘हायड्रोजन बस’ 
‘पीएमपी’च्या ताफ्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होणार

सीएनजी, इलेक्ट्रिकनंतर आता ‘हायड्रोजन बस’ ‘पीएमपी’च्या ताफ्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होणार

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० ः पीएमपीचा ‘प्रवास’ आता ‘हायड्रोजन’च्या दिशेने होणार आहे. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात ‘हायड्रोजन बस’ दाखल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ‘हायड्रोजन’वरील दोन बस धावणार आहेत. यासाठी पीएमपी प्रशासन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांची मदत घेणार आहे. तसेच ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतदेखील चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, पीएमपी प्रशासनाने पर्यायी इंधनाच्या वापराकडे लक्ष केंद्रित केले आहे. हायड्रोजन इंधन हे स्वच्छ आणि प्रदूषणरहित मानले जाते. त्याच्या ज्वलनामुळे केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. परिणामी वातावरणात कार्बन उत्सर्जन होत नाही. यामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि नागरिकांचे आरोग्य अधिक चांगले राहील. ‘पीएमपीएमएल’चा हा निर्णय केवळ वाहतुकीच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

ही बस कशी धावणार :
- हायड्रोजन बसमध्ये फ्युएल सेल बसविलेले असते.
- फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेतून वीज निर्माण केली जाते.
- ही वीज बसची इलेक्ट्रिक मोटर चालविण्यासाठी वापरली जाते.
- त्यामुळे बस चालते आणि उत्सर्जन म्हणून केवळ पाणी बाहेर पडते.
---------
बसची वैशिष्‍ट्ये ः
लांबी ः बारा मीटर
प्रवासी क्षमता : ४० बसलेले, उभे २० ते २५
इंधन टाकी ः ८ ते १२ किलो
इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ : सरासरी १० ते १२ मिनिटे
किती धावणार : सुमारे २८० ते ३५० किलोमीटर
------------
‘‘प्रायोगिक तत्त्वावर दोन हायड्रोजन बस धावणार आहेत. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. यासाठी नवीन बस घ्यायची की उपलब्ध बसमध्येच रेट्रो फिटिंग करून हायड्रोजन बसची निर्मिती करायची, यावर चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत स्पष्टता येईल.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे
-----------------
‘‘पीएमपीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन हायड्रोजन बसची चाचणी केली जाणार आहे. यासाठी पीएमपीसोबत चर्चा सुरू असून, आम्ही ‘एनसीएल’चीदेखील मदत घेणार आहोत.
- ओमप्रकाश बकोरिया, महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com