तनिष्का व्यासपीठ, ‘इंद्रिया’तर्फे महिलांसाठी अनोखा उपक्रम
पुणे, ता. ३१ : छानसा मेकअप करून, तर कुणी पारंपरिक वेशभूषा करून, कुणी रॅम्प वॉक करून महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखवून दिली.
सकाळ माध्यम समूह, इंद्रिया (आदित्य बिर्ला ज्वेलरी) आणि तनिष्का व्यासपीठ यांच्यातर्फे बंड गार्डन येथील दालनात ‘महाराष्ट्राची परंपरा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तनिष्का सदस्या आणि इतर महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा, उखाणे, गाणी यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बक्षिसेही मिळवली. प्रा. प्रकाश दळवी यांनी मनोरंजनात्मक पद्धतीने परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून दिली. याप्रसंगी तनिष्का गटप्रमुख मंगला मंत्री, सुरेखा कवडे, स्नेहा गवळी, संगीता लोढा, ज्योती गवारे, उषा माने यांच्यासह वानवडी, कॅम्प, येरवडा, वडगाव शेरी येथील तनिष्का सदस्या आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी ‘इंद्रिया’चे नवनवीन दागिने परिधान करून मोठ्या उत्साहात फोटोशूटही केला. तनिष्का विभाग समन्वयक प्रयागा होगे यांनी सूत्रसंचालन आणि संयोजन केले.
------------------
फोटोः 36306, 36309