आज पुण्यात २ ऑगस्ट २०२५ शनिवार
आज पुण्यात २ ऑगस्ट २०२५ शनिवार
.................................... ........
सकाळी ः
वैदिक संमेलन ः श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित ः वैदिक संमेलन, परिसंवाद, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, ‘हिंदुत्व म्हणजे काय?’ या विषयावर प्रवचन ः प्रा. शंकर अभ्यंकर यांचा विशेष सत्कार ः वेदशास्त्रोत्तेजक सभा, सदाशिव पेठ ः ८.००.
गुरुपूजन समारंभ ः गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांचा गुरुपूजन समारंभ ः पं. अजय पोहनकर शिष्यांचे गायन ः गांधर्व महाविद्यालय, विष्णू विनायक स्वरमंदिर, शनिवार पेठ, मेहुणपुरा ः १०.००.
प्रदर्शन व मेळावा ः उन्नती ग्रुपमधील प्रमाणित महिला विक्रेत्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन ः श्रावण किंग आणि क्वीन शो ः सुगम संगीत- श्रावणगीत ः पुण्याई सभागृह, पौड रस्ता, कोथरूड ः १०.००.
पुरस्कार वितरण ः अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे ः बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार ः हस्ते- लक्ष्मीकांत देशमुख ः अध्यक्ष- प्रसाद भडसावळे ः लता मंगेशकर सभागृह, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर ः १०.३०.
पप्पा सांगा कुणाचे... ः पुणे प्रीमियर शो आयोजित ः अरुण सरनाईक यांच्यावरील वेधक माहितीपट- पप्पा सांगा कुणाचे... ः दिग्दर्शन- डॉ. संतोष पाठारे ः प्रमुख पाहुणे- शरद पवार ः उपस्थिती- डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः १०.३०.
दुपारी ः
सत्कार ः नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन व सूर्यादत्ता ग्रुप इन्स्टिट्यूटतर्फे ः पुणे विभागातील ५० महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ः डॉ. सचिन इटकर, डॉ. राजेंद्र पाटील यांना विशेष पुरस्कार ः अध्यक्ष- प्रमोद नाईक ः उपस्थिती- विजय पाटील, डॉ. विजय कोल्हे, डी. व्ही. जाधव, डॉ. संजय चोरडिया ः सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन ः २.००.
महिला सुरक्षितता प्रशिक्षण ः स्त्री आधार केंद्रातर्फे ः गणेशोत्सव व नवरात्रीच्या निमित्ताने सुरक्षितता प्रशिक्षण ः अध्यक्षा- नीलम गोऱ्हे ः उपस्थिती- पंकज देशमुख, विवेक नायडू, पोपट येले, राजेंद्र मुळीक ः एस. एम. जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार संघाच्या मागे, गांजवे चौक, नवी पेठ ः ३.००.
सायंकाळी ः
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला ः विषय- आषाढ पौर्णिमेचे महत्त्व ः प्रवचनकार- डॉ. सुरेश कठाने ः अध्यक्षा- लीला बनसोडे ः स्वागताध्यक्षा- आरती गमरे ः प्रमुख पाहुणे- अशोक गायकवाड ः राहुल युवक संघ व सावित्रीबाई फुले ज्ञानदीप महिला मंडळाचे बुद्धविहार, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या मागे, शिवदर्शन ः ५.००.
नृत्यमय अभिवादन ः कलाछाया आयोजित ः हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त नृत्यमय अभिवादन ः सादरकर्ते- रेखा नाडगौडा, पार्वती दत्ता, संजीवनी कुलकर्णी, जयश्री जंगम व अन्य ः प्रमुख पाहुणे- शारंगधर साठे ः विदुषी रेखा नाडगौडा यांचा विशेष सन्मान ः कलाछाया कल्चर सेंटर, पत्रकारनगर ः ५.३०.
गायन ः भारत गायन समाजाच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे ः माणिक भक्ती- माणिक वर्मा यांच्या भक्तिगीत आणि भावगीतांचा कार्यक्रम ः गायन- शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार, दीपिका जोग व अन्य ः उपस्थिती- राणी वर्मा ः प्रा. केतकर सभागृह, बाजीराव रस्ता ः ५.३०.
पुरस्कार वितरण ः श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ः ग्रामदेवता पुरस्कार ः पुरस्कारार्थी- परसिस्टंट फाउंडेशन ः सेवाव्रत गौरव सन्मान ः पुरस्कारार्थी- श्री पोटसुळ्या मारुती मंडळ व कामायनी संशोधन व प्रशिक्षण सोसायटी ः अध्यक्षा- माधुरी मिसाळ ः प्रमुख पाहुणे- हेमंत रासने, पुनीत बालन, कृषिकेष रावले ः लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता ः ५.३०.
गीत अथर्वशीर्ष ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीत अथर्वशीर्ष’ ः गायन- शुभदा आठवले, संपदा थिटे ः नृत्यरचना- डॉ. मीनल कुलकर्णी ः निवेदन- स्वराली गोखले ः भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः मल्हार ॲकॅडमी ऑफ म्युझिकतर्फे ः ‘त्रिवेणी’ कार्यक्रमात जाई परांजपे, जुई देशपांडे, ईशिता सावळे ः जुनी आणि नवी मराठी आणि हिंदी गीतांची मैफील ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, शुक्रवार पेठ ः ६.००.
कराओके कार्यक्रम ः स्वरयात्री आयोजित ः जुन्या हिंदी निवडक गीतांचा कराओके कार्यक्रम ः पत्रकार भवन, गांजवे चौक ः ६.००.
व्याख्यान ः श्री मल्हार पब्लिकेशन आयोजित व्याख्यान ः विषय- दुर्गराज रायगड- एक नवा दृष्टिक्षेप ः वक्ते- राज मेमाणे ः वि. का. राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधक मंडळ ः ६.००.
अनुभवकथन ः वाईल्ड आयोजित ः निसर्ग आणि वन्यजीवन छायाचित्रकारांना आलेले अनुभव ः सहभाग- किरण पुरंदरे, राहुल बेलसरे, राजेश कंगे, श्रीराम साळसकर ः इंद्रधनुष्य सभागृह, म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्रनगर ः ६.३०.
बेसरबिंदी ः अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट् असोसिएशन आयोजित ः बेसरबिंदी- ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम ः संपादन- आशिष चासकर ः कलाकार- जान्हवी नाफडे, प्रशांत कुलकर्णी ः एफटीआयआय, ओल्ड मेन सेंटर, लॉ कॉलेज रस्ता ः ७.००.
........................... ......................... ............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.