समविचारी पक्षांसोबत 
हिंदू महासभेची आघाडी

समविचारी पक्षांसोबत हिंदू महासभेची आघाडी

Published on

पुणे, ता. १ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका हिंदू महासभा समविचारी पक्षांसोबत लढवणार असल्याची घोषणा सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. दत्तात्रेय सणस, उपाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, प्रमुख कार्यवाह महेश सावंत पटेल, हरीश शेलार, राजू तोरसकर, तिलोत्तमा खानविलकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी भोगले म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका सत्ताधारी भाजप जाणीवपूर्वक लांबणीवर टाकत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक आयोगाने वेळकाढूपणा केला आहे. मतदारांचा कल भाजपकडे नसल्याने सत्ता वाचवण्यासाठी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली होत आहे. भयमुक्त वातावरण, खड्डेमुक्त रस्ते, रुग्णालये, क्रीडांगणे, वीजबिलांवर नियंत्रण, रोजगाराच्या संधी, जुनी वास्तू जतन, तसेच विकासाच्या नावाखाली होणारे उद्योग स्थलांतर रोखणे यासाठी हिंदू महासभा समविचारी पक्षांसह कटिबद्ध राहील. हिंदू महासभेचा लवकरच वचननामा जाहीर केला जाईल.’’
----------------

Marathi News Esakal
www.esakal.com