आज पुण्यात ३ ऑगस्ट २०२५ रविवार
आज पुण्यात ३ ऑगस्ट २०२५ रविवार
............................. .............................. .......
सकाळी ः
मार्गदर्शन ः हार्टफुलनेस ध्यानसत्र आणि जीवनशैली परिवर्तनासह सुलभ वजन घटविणे आणि औषधावाचून मधुमेह नियंत्रणात आणणे या विषयावर मार्गदर्शन ः वक्ते- डॉ. जगन्नाथ दीक्षित ः श्रीराम चंद्र मिशन, हार्टफुलनेस ध्यान केंद्र, पवार पब्लिक स्कूलजवळ, नांदेड सिटी ः ७.३०.
गुणगौरव समारंभ ः क्रांतिवीर लहूजी वस्ताद प्रतिष्ठान आयोजित ः प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा गुणगौरव ः विविध पुरस्करांचे वितरण ः हस्ते- अमित गोरखे, डॉ. सुधाकर जाधवर ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ८.००.
वैदिक संमेलन ः श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा आयोजित ः वैदिक संमेलन ः सामवेद कौथुम, सामवेद जैमिनीय, अथर्ववेद शौनक, अथर्ववेद पैप्पलाद मंत्रजागर, ‘यज्ञीय वृक्षांचे समकालीन औचित्य’ या विषयावर वैद्य कौशिक दाते यांचे व्याख्यान ः संमेलनाचा समारोप ः उपस्थिती- शरद जोशी ः वेदशास्त्रोत्तेजक सभा, सदाशिव पेठ ः ८.००.
सभा ः डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ः डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांना सन्मानपत्र प्रदान ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, गांजवे चौक ः १०.००.
गौरव पुरस्कार प्रदान सोहळा ः ‘आर्टिस्ट्री’ संस्थेतर्फे ः स्व. दिलीप गोखले स्मृती प्रीत्यर्थ ‘देणे समाजाचे’ गौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- सुरेश फडतरे ः हस्ते- पं. अतुलकुमार उपाध्ये ः सुरेश फडतरे यांचे संवादिनी वादन व साहिल पुंडलिक यांचे सहवादन ः अमोल माळी (तबलासाथ) ः प्रभू ज्ञानमंदिर, ४था मजला, निवारा वृद्धाश्रमासमोर, शिक्षक भवन, नवी पेठ ः ११.००.
दुपारी ः
चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ः आर्ट बिट्स फाउंडेशनतर्फे ः महाराष्ट्रातील निवडक तरुण चित्रकारांची विविध चित्रे आणि शिल्पांचे प्रदर्शन ः हस्ते- दीपक सोनार ः उपस्थिती- डॉ. सुहास बहुलकर, डॉ. अमृता देसरडा, डॉ. आर. बी. होले, जितेंद्र सुतार ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १२.००.
महिला मेळावा व संमेलन ः अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ः महिला मेळावा आणि सभासद संमेलन ः उपस्थिती- डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रा. मोहिनी पत्की ः लॉ कॉलेज रस्ता, आगाशे शाळेचे सभागृह ः ३.००.
सांस्कृतिक कार्यक्रम ः महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संगठनतर्फे ः माहेश्वरी युवक-युवतींचे संगीत, नृत्य, वक्तृत्व व नाट्य अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण ः गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट ः ३.००.
सायंकाळी ः
चर्चासत्र ः सजग नागरिक मंचातर्फे ः विषय- ‘पादचारी रस्त्याचा राजा, पुणे शहरातील सद्यःस्थिती’ ः सहभाग- रणजित गाडगीळ, हर्षद अभ्यंकर ः आयएमडीआर सभागृह, बीएमसीसी रस्ता ः ५.००.
पुरस्कार वितरण ः नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित ः दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे पारितोषिक वितरण ः हस्ते- संजीवनी बोकील ः उपस्थिती- श्रीयोगी मुंगी ः उद्यान प्रसाद सभागृह, सदाशिव पेठ ः ५.००.
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला ः विषय- बौद्ध धर्मातील प्रमुख महिलांचे योगदान ः प्रवचनकार- उपेक्षा वनशिव ः अध्यक्षा- लीला बनसोडे ः स्वागताध्यक्षा- विजय बोकेफडे ः प्रमुख पाहुण्या- लीला बनसोडे ः २७६, तक्षशिला बुद्धविहार, पाच बिल्डिंग चौकाजवळ, रमाबाई आंबेडकर रस्ता ः ५.००.
व्याख्यान ः दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थान आयोजित ः
विषय- लोकगीताकडून प्रबोधनाकडे ः वक्त्या- वर्षा गुप्ते ः अध्यक्ष- दादासाहेब सोनवणे ः साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, के ब्लॉक नेहरू स्टेडियम, सारसबागेसमोर ः ५.००.
पुरस्कार वितरण ः साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित ः अनिल कांबळे स्मृत्यर्थ गझलदीप पुरस्कार ः पुरस्कारार्थी- वैभव कुलकर्णी ः हस्ते- भूषण कटककर ः निवेदन- चिन्मयी चिटणीस ः गझल मुशायरा ः सहभाग- प्रमोद खराडे, दास पाटील, प्राजक्ता पटवर्धन व अन्य ः महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ५.३०.
संगीत मैफील ः सर्वेश इव्हेंट्स आयोजित ः पं. अप्पासाहेब जळगावकर जन्मशताब्दी संगीत मैफील ः गायन- पल्लवी पिळणकर, श्रीनिधी गोडबोले ः सहवादन- जया जोग, सुरेश फडतरे, हनुमंत फडतरे ः एसएनडीटी पीजीएसआर सभागृह, तिसरा मजला, नळस्टॉप मेट्रोशेजारी, कोथरूड ः ५.३०.
................ ................. .................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.