प्रमुख मंडळांचे पदाधिकारी म्हणतात...

प्रमुख मंडळांचे पदाधिकारी म्हणतात...

Published on

हेमंत रासने, आमदार : गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्याबरोबरच उत्सवातील १० दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त काळ ध्वनिवर्धकाला परवानगी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पथकांमुळे विसर्जन मिरवणुकीस विलंब होतो, गर्दीवर नियंत्रण ठेवले जात नाही. उत्सवाचे पावित्र्य राखले जात नाही. उत्सवावर बंधन का आले, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुठलेही मंडळ डावे-उजवे नाही. विसर्जन मिरवणूक किती काळ चालली, यापेक्षा मिरवणूक योग्य वेळेत अन् योग्य पद्धतीने कशी पार पडेल, याकडे लक्ष दिले जाईल. वादाचे विषय बाजूला ठेवून उत्सव व मिरवणूक पार पाडली जाईल.

महेश सूर्यवंशी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट : मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळण्यासाठी दगडूशेठ मंडळाने मिरवणुकीत सहभागी होण्याच्या आपल्या वेळेत बदल केला. त्यावरून होणाऱ्या मतमतांतराचा विषय आता संपवून टाकू. सामंजस्याची भूमिका घेऊ. दुसऱ्यादिवशी सकाळी आठ-नऊ वाजता मिरवणूक कशी संपेल, याचा विचार करू. गर्दीचे नियोजन करून मेट्रोसेवा रात्रभर सुरू ठेवण्याची गरज आहे.

श्‍याम मानकर : हत्ती गणपती मंडळ : विसर्जन मिरवणुकीतील सहभागाच्या मुद्‌द्‌यावरून मंडळांमध्ये गढूळ वातावरण तयार झाले आहे. हा प्रश्‍न कसबा मतदारसंघापुरता आहे. २०० मंडळांनी बैठक घेतली. पोलिसांनी टिळक रस्त्यासंबंधी डिजिटल काम केले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न पोलिसांसमोर मांडून तो सोडविण्याची भूमिका घेतली तर अडचण संपेल.

बाळासाहेब मारणे : बाबू गेनू मंडळ : खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेने रस्ते दुरुस्तीवर भर द्यावा. अनेक रस्त्यांवर अंधार असतो, तिथे महापालिकेने पथदिवे लावावेत. बाबू गेनू मंडळामागील मेट्रोच्या बाहेर पडणाऱ्या दरवाजाजवळ वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्सवाच्या कालावधीत ध्वनिवर्धकाला परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत.

रवींद्र माळवदकर : राष्ट्रीय साखळीपीर तालीम मंडळ : विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या कारणावरून विनाकारण वाद निर्माण करू नये. चळवळीने केलेले काम टिकते, हे लक्षात घेऊन मंडळांनी एकत्रित कामे करण्यास प्राधान्य द्यावे.

दीपक मानकर : भोलेनाथ गणेशोत्सव मंडळ : पोलिसांची कामे कार्यकर्त्यांना करण्याची वेळ आली आहे. पुण्यात सर्व पोलिस अधिकारी नवीन असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यावर गणेशोत्सवापुरती जबाबदारी द्यावी. कोणी स्वतःहून वर्गणी देत असेल तर जरूर घ्या, पण माझ्या वर्गणीशिवाय मंडळ चालत नाही, हा गैरसमज काढून टाका. सगळी कामे पैशाने होत नाहीत. मानाच्या गणपती मंडळांनीही उर्वरित मंडळांच्या भावना समजून घ्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com