पादचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधा आवश्यक

पादचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधा आवश्यक

Published on

पुणे, ता. ४ ः पदपथ मोठे करणे म्हणजे रस्त्यांची जागा कमी होते असे नाही. जेथे पदपथ मोठे नाहीत, त्याठिकाणी पादचारी रस्त्यावरूनच चालतात. वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी कमीत कमी वाहने रस्त्यावर आली पाहिजेत. पादचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी निर्णय घेणाऱ्यांनी प्रत्यक्षात पायी चालण्याचा अनुभव घेतला पाहिजे. पादचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या बदलू शकते, असा सूर वाहतूक तज्ज्ञांच्या चर्चेतून उमटला.
सजग नागरिक मंचकडून ‘पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि पादचारी सुरक्षा’ या विषयावर शनिवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे अध्यक्ष हर्षद अभ्यंकर, परिसर संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ, पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी पुण्यातील वाहतूक समस्या, त्याचा पादचाऱ्यांवर होणारा परिणाम आणि इतर समस्यांबाबत कोणते मार्ग अवलंबले पाहिजेत या विषयाचा ऊहापोह केला. सजग नागरिक मंचचे जुगल राठी यावेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, ‘‘वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पादचाऱ्यांना सुरक्षित चालणेही कठीण झाले आहे. वाहनांच्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी रस्ते रुंद करण्यापेक्षा रस्त्यावर कमीतकमी वाहने कसे येतील, या अमेरिकन धोरणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांच्या हक्कासाठी सुस्पष्ट धोरण आवश्यक आहे.’’ तर अभ्यंकर म्हणाले, ‘‘शहराच्या विकासासाठी प्रथम पदपथ हा नागरिकांचा मूलभूत हक्क हा केंद्रबिंदू ठरवून नियोजन करणे, आराखडे बनवून त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, वाहतूक सिग्नल पादचाऱ्यांसाठीचा कालावधी, वाहनांची वेग मर्यादा, उंच पादचारी पूल यांचे नियोजन करून वाढत्या वाहनांच्या संख्येवर अंकुश आणण्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे.
शितोळे म्हणाले, ‘‘वाहतूक विकास धोरण (आयटीडीपी) या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुणे शहरात ४१ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे असून ५० टक्क्यांहून अधिक पदपथ अतिक्रमणबाधित असल्याने लोकांना चालण्यासाठीही सोयीचे नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com