एसआयआयएलसी

एसआयआयएलसी
Published on

प्रात्यक्षिकाद्वारे शिका लिक्विड ग्रेव्ही व पेस्ट
पुणे, ता. ११ : बाजारपेठेची मागणी, सद्यःस्थितीची गरज पाहता ‘रेडी टू कुक’ ओली ग्रेव्ही व पेस्ट यांची वाढती मागणी आहे. यातून नवीन उद्योग सुरू करण्याची संधी लक्षात घेता सहा महिने टिकतील अशा ग्रेव्ही व पेस्ट कसे तयार करावेत याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा १३ एप्रिलला आयोजिली आहे. यामध्ये टोमॅटो प्युरी, कांदा, हिरवी मिरची, पालक, आले - लसूण व चिंच या पेस्ट, इन्स्टंट कोल्हापुरी तांबडा - पांढरा रस्सा ग्रेव्ही, पंजाबी रेड, व्हाइट, हैदराबादी, महाराष्ट्रीयन, स्पेशल बिर्याणी, मिसळ, सावजी, चायनीज, फिश करी, सांबर, कोकणी, पाणीपुरी व भेळ ग्रेव्ही हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी इ. विषयी मार्गदर्शन होणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

जाणून घ्या कमर्शिअल लँडस्केप गार्डनिंग
कंपन्या, शासकीय वा खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी, शहरी उद्याने, चौक वा रस्त्यांवरील उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी लँडस्केप डिझायनर्सची मागणी असून या व्यवसायातही खूप संधी आहेत. लँडस्केप डिझाईनिंग कसे करतात, व्यवसायातील संधी, आवश्यक बाबी, विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी करिअरला वाव, लँडस्केपिंगसाठी जागेची निवड इ. विषयी ऑनलाइन कार्यशाळा १५ एप्रिलपासून आयोजिली आहे. यात लँडस्केप डिझाईनिंग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. गृहिणी, नर्सरी मालक, कार्पोरेट क्षेत्रातील व कृषी क्षेत्रातील इच्छुक, अंतर्गत सजावट करणारे इंटिरियर डिझायनर, वास्तुरचनाकार आणि विविध व्यावसायिकांसाठी कार्यशाळा फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती शुल्क पाचशे रुपये. संपर्क : ८४८४८११५४४

बोअरवेल भूजल पातळी मॉनिटरिंग प्रशिक्षण
भारत सरकार अनुदानित भूजल अॅप हे कृषी मंत्रालयाने नावीन्यपूर्ण संशोधन म्हणून मान्य केलेले पेटन्टेड मोबाईल अॅप आहे. या भूजल अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे घरबसल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी अवघ्या एक मिनिटात मोजता येते. या अॅपच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १५ एप्रिलला आयोजिले आहे. प्रशिक्षणात भूजल अॅपच्या मदतीने बोअरवेल व्यवस्थापन, भूजल पातळी मॉनिटरिंग करण्याच्या अत्याधुनिक पद्धती, शाश्वत शेतीसाठी पाणी बचत आणि नियोजन, वीज आणि पाणी बचतीचे फायदे आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांसाठी भूजल अॅप वापरण्याचे फायदे म्हणजे याद्वारे बोअरवेलचे योग्य व्यवस्थापन होते, पाण्याच्या उपलब्धतेनुसार अधिक फायदेशीर शेती करता येते व उन्हाळ्यात पिकांचे नुकसान टाळता येते, जनावरांसाठी व आपत्कालीन वापरासाठी पाणी राखून ठेवता येते, वीज बचत व शाश्वत जलसंधारण ही उद्दिष्टे साधता येतात. संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१

ॲग्री कमोडिटी फ्युचर्स मार्केटविषयी कार्यशाळा
कमोडिटी मार्केट म्हणजे नक्की काय, स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केट यात फरक काय, इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचचे कार्य कसे चालते, कमोडिटी बाजारात शेतकरी कंपन्या, गट किंवा वैयक्तिक व्यापारी, प्रक्रियादार, गुंतवणूकदार इ. साठी काय संधी आहेत, याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २२ एप्रिलला आयोजिली आहे. यात वायदेबाजाराची ओळख, बाजारभाव ठरविणाऱ्या मूलभूत घटकांची माहिती, सेबीसह विविध संस्थांचे नियंत्रण, नियम-अटी, जोखीम व्यवस्थापनातील फ्युचर मार्केटची उपयुक्तता तसेच फ्युचर्स कमोडिटी मार्केटमध्ये खाते कसे उघडावे, ट्रेडिंगची सुरुवात कशी करावी, त्यासाठी आवश्यक मार्जिन, ब्रोकर्सकडील तांत्रिक व मूलभूत रिसर्चचा ॲक्सेस कसा मिळवावा, ट्रेड झाल्यानंतरच्या प्रक्रिया, थेट पोच किंवा डिलिव्हरी घेण्याची प्रक्रिया इ. विषयी मार्गदर्शन करणार आहेत. संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com