

नवीन आज पुण्यात- शनिवार १२ एप्रिल २०२५ साठी
+++++++++++++++++++++++++++
सकाळी
-ग्रीन एक्स्पो : पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांचा पुढाकाराने दोनदिवसीय कार्यक्रम : उट्घाटक- दत्तात्रेय भरणे : प्रमुख पाहुणे- किशोर देसाई, शीतल शहा, वसंतराव माळुंजकर : स्थळ- गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट : १०.३०.
सायंकाळी
-मैफील : भारतरत्न पं. रवी शंकर यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त ‘सतार भास्कर पंडित रविशंकर’- एक अनोखी सूरमयी मैफल : सादरकर्ते- पं. चंद्रशेखर फणसे : प्रमुख पाहुणे- पं. उदय भवाळकर : संकल्पना- पं. चंद्रशेखर फणसे : हिंदी गीत गायन- श्रुती करंदीकर : आयोजक- श्रुती गुंजन परिवार : स्थळ- गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, सदाशिव पेठ : ५.००
-पुस्तक प्रकाशन : प्रा. शरद जावडेकर लिखित ‘मोदी सरकारचा शिक्षणासाठीचा खर्च : चिकित्सा’ या पुस्तकाचे प्रकाशन : हस्ते- लक्ष्मीकांत देशमुख : अध्यक्ष- डॉ. अभिजित वैद्य : आयोजक - लोकनेते भाई वैद्य अकादमी आणि अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा : स्थळ- प्रबोधन सभागृह, लोकनेते भाई वैद्य अकादमी, हमाल नगर, मार्केट यार्ड : ५.३०.
-स्नेहमेळावा : हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुण्यातील खेळाडू व क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा : उपस्थिती- विजय रजपूत, शैलेश आपटे, विजय पुरंदरे, राज चौधरी : आयोजक- क्रीडा भारती : स्थळ- क्रीडा भारती कार्यालय, ‘के’ ब्लॉक, नेहरू स्टेडियम, स्वारगेट : ६.००
-मेळावा : विविध सण आणि विविध जयंत्यांनिमित्त सर्व जातिधर्मातील बंधुभगिनींमध्ये ऐक्य, प्रेम, आणि सुसंवाद वाढवण्याचा स्नेहसंवाद मेळावा : उपस्थिती- डॉ. एस. एन. पठाण, उल्हास पवार, ह.भ.प. पंकज महाराज गावडे : आयोजक- शिवमहोत्सव समिती, साखळीपीर तालीम आणि राष्ट्रीय मारुती मंदिर : स्थळ- साखळीपीर तालीम, राष्ट्रीय मारुती मंदिर, नाना पेठ, भाजी मंडई : ७.००
-कलाविष्कार : ‘डहाळी’ अनियतकालिकाच्या ७००व्या अंकाचे प्रकाशन, ‘सबकुछ मधुसूदन’ एकपात्रीचा ८२,०००वा प्रयोग : सादरकर्ते - डॉ. मधुसूदन घाणेकर : प्रमुख अतिथी-
प्रिया दामले, डॉ. जयश्री बेलसरे, चित्रा साठ्ये, अभिषेक खेडेकर : स्थळ- भारतीय विचार साधना, पावन मारुती चौकाजवळ, लिमयेवाडी, सदाशिव पेठ : ७.००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.