खेळाडू विद्यार्थ्यांना प्रस्तावासाठी मुदतवाढ

खेळाडू विद्यार्थ्यांना प्रस्तावासाठी मुदतवाढ
Published on

पुणे, ता. ११ : फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून आपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत होती. परंतु, १० ते १४ एप्रिल या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे क्रीडा गुणाच्या सवलतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com