उन्हाळा आला; पण शिबिरांची प्रतीक्षाच
पुणे, ता. १३ : एरवी एप्रिल महिना येताच लहान मुलांना वेध लागतात ते नानाविध शिबिरांचे... सकाळी आणि सायंकाळी शहरातील वेगवेगळी सभागृह या चिमुरड्यांच्या आवाजाने अन् विविध गोष्टी शिकण्याच्या कुतूहलाने भरून गेलेली असतात. यंदा मात्र उन्हाळा आला असला तरी शिबिरांची चाहूल मात्र लागलेली नाही. कारण यंदा शाळांच्या सुट्ट्या लांबणीवर पडल्यामुळे शिबिरांनी मे महिन्याचा मुहूर्त गाठला आहे.
यंदा शाळांच्या सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आला असून २५ एप्रिलपासून सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे. साहजिकच त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिबिरांच्या काळातही बदल झाला आहे. एरवी मार्च - एप्रिल महिन्यातच सुरू होणाऱ्या शिबिरांना यंदा आपले वेळापत्रक मे महिन्यात आखावे लागले आहे. यामुळे शिबिरांचा कालावधीही कमी होणार असून दीड - दोन महिना सुरू राहणारी शिबिरे एक महिनाच सुरू राहणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी विविध कल्पक शिबिरांचे आयोजन केले जाते. यात नृत्य, अभिनय, संगीत आदी कलाविषयक शिबिरांचा समावेश असतो. यातील बालनाट्य शिबिरांना तर मुलांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यासह धनुर्विद्या, घोडेस्वारी, निसर्गभ्रमण, गिर्यारोहण अशा साहसी खेळांची शिबिरे, क्रिकेट, पोहणे, बास्केटबॉल अशा पारंपरिक क्रीडा प्रकारांची शिबिरे, वैज्ञानिक खेळ, कला व हस्तकला कार्यशाळा आदी शिबिरांचेही आयोजन केले जाते. सुट्ट्यांमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासह मुलांच्या सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासाला प्रोत्साहन देणे, हा यामागील हेतू असतो.
उन्हाळी शिबिरांचे फायदे
- नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी
- मुलांमधील निरनिराळ्या आवडीनिवडी जाणून घेण्याची संधी
- आत्मविश्वास वाढणे, व्यक्तिमत्त्व विकास
- संवाद कौशल्य विकसित होणे
- साहसी खेळांच्या शिबिरांमधून व्यायामाची आवड
- नवीन मित्रमैत्रिणी जोडण्याची संधी
- मोबाईल आणि संगणकापासून दूर जात प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव जाणून घेता येतात
आमचे उन्हाळ्यातील नाट्य शिबिर एप्रिलमध्येच सुरू होते. मात्र यंदा शाळांच्या सुट्ट्यांमुळे पालकही संभ्रमात आहेत. नक्की कधीपासून सुट्ट्या असतील, याची कल्पना नसल्यामुळे शिबिरांचे वेळापत्रक ठरवता आलेले नाही. पालकांनीही त्यामुळे अद्याप शिबिरांसाठी नोंदणी केलेली नाही.
- हर्षद राजपाठक, महाराष्ट्र कल्चरल सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

