कमर्शिअल लँडस्केप गार्डनिंग

कमर्शिअल लँडस्केप गार्डनिंग

Published on

पुणे, ता. १३ : कंपन्या, शासकीय वा खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी, शहरी उद्याने, चौक वा रस्त्यांवरील उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी लँडस्केप डिझाइनर्सची मागणी असून या व्यवसायातही खूप संधी आहेत. लँडस्केप डिझायनिंग कसे करतात, व्यवसायातील संधी, विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी करिअरला वाव, लँडस्केपिंगसाठी जागेची निवड इ.विषयी ऑनलाइन कार्यशाळा १५ एप्रिलपासून आयोजिली आहे. यात लँडस्केप डिझायनिंग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. गृहिणी, नर्सरी मालक, कार्पोरेट व कृषी क्षेत्रातील इच्छुक, अंतर्गत सजावट करणारे इंटिरियर डिझायनर, वास्तुरचनाकार आणि विविध व्यावसायिकांसाठी कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १८, १९ व २० एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्यावसायिक मसाले
गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, चाट मसाला, मिसळ मसाला, चहा मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, काळा मसाला इ. घरगुती चवीचे, झणझणीत कोल्हापुरी मसाले कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण १९ व २० एप्रिलला आयोजिले आहे. यात व्यावसायिक दृष्टीने मसाले कसे तयार करावे, मसाला व्यवसायाची सुरुवात कशी करावी, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण झाल्यास सर्व मसाला रेसीपींच्या पीडीएफ नोट्सही पुरवल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com