प्राध्यापक कौशल्य प्रशिक्षण

प्राध्यापक कौशल्य प्रशिक्षण

Published on

पुणे, ता. १३ : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रभावी अध्यापन या विषयावर विशेष प्राध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
देशभरातील महाविद्यालयीन शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा घडवून आणणे, नवोपक्रमांना चालना देऊन आणि शैक्षणिक परिणाम सुधारून अध्यापन पद्धतीत नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून बदल घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अभियांत्रिकी, कृषी, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन महाविद्यालये या क्षेत्रातील प्राध्यापक, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापकांसाठी उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
या प्रशिक्षणात वर्गात विद्यार्थ्यांचा सहभाग प्रभावीरीत्या कसा वाढवावा, विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचार आणि शिकण्याची प्रेरणा कशी वाढवायची, स्वतःच्या शिकवणीला नवा आयाम देऊन विद्यार्थ्यांशी सशक्तपणे संपर्क कसा प्रस्थापित करायचा, वर्ग अधिक डायनॅमिक आणि आकर्षक कसे बनवावेत, कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्याच्या शिक्षणावर काय प्रभाव पडत आहे व या तंत्राने शिक्षण क्षेत्रात कसा बदल घडत आहे, कंटेंट तयार करणे सोपे आणि आकर्षक कसे करता येईल यासाठी अत्याधुनिक साधने कोणती आहेत व त्यांचा प्रभावी वापर कसा करायचा, संशोधन पद्धती आणि डेटा विश्लेषणाची क्षमता वाढवण्यासाठी एआयचा वापर कसा करायचा हे सर्व हँड्स ऑन अनुभव देऊन शिकविणार आहेत. हे एक दिवसीय परस्परसंवादी आणि प्रात्यक्षिकासह होणारे प्रशिक्षण आहे जे शिक्षक, प्राध्यापकांना शिक्षणाच्या बदलत्या दृष्टिकोनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने, तंत्रे आणि ज्ञान प्रदान करेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com