

पुणे, ता. १३ ः ऋणवसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) आयोजित करण्यात आलेल्या पाच लोकअदालतींत एकूण एक हजार ३५२ दावे निकाली निघाले. त्यामध्ये एकूण ५८५ कोटी रुपयांची थकीत कर्जाची तडजोड करण्यात आली आहे. बँका आणि वित्तीय संस्थांनी दाखल केलेल्या दाव्यांची सुनावणी करून ऋणवसुलीच्या दृष्टीने या लोकअदालती महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १४१ खटले सामोपचाराने मिटविण्यात यश आले. या दाव्यांच्या तडजोडीतून बँकांचे सुमारे २०२ कोटी रुपयांचे प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि डीआरटी बार असोसिएशन यांच्या माध्यमातून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण १६१ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.
‘डीआरटी’ म्हणजे काय?
‘डीआरटी’ ही संस्था वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय आधिपत्याखाली असूनही न्यायालयीन स्वायत्तता अबाधित ठेवून काम करते. देशभरात सध्या ३९ ‘डीआरटी’ आणि ५ अपिलीय न्यायाधिकरणे कार्यरत आहेत. राज्यात सहा ‘डीआरटी’ कार्यरत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातसाठी मुंबई येथील अपिलीय न्यायाधिकरण कार्यरत असून, येथील निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.
कोणते दावे दाखल केले जातात?
- २० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे थकीत कर्ज
- राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे कर्ज
- ‘एनबीएफसी’चे कर्ज प्रकरण
- गुंतवणूकदारांचे/कर्जदारांचे व्यावसायिक व्यवहार
- बॅंक गॅरंटी फसवणूक प्रकरणे
लोकअदालतीची तारीख- निकाली निघालेले दावे - दाव्याची एकूण रक्कम ( कोटी रुपयांत) - तडजोड रक्कम ( कोटी रुपयांत)
३ मार्च २०२४ - १२४ -३५०- २१५
२७ जुलै २०२४ - १४० -३४४ -२४८
२८ सप्टेंबर २०२४- ११९ -२२६ -१००
१४ डिसेंबर २०२४ - ६१ -१९९- १६६
२२ मार्च २०२५- १४१ - २३३ - २०२
एकूण - ५८५ -१३५२ - ९३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.