रुचिता साहिल यांच्या ‘अंतरीचे गूज’ कथासंग्रहाचे प्रकाशन

रुचिता साहिल यांच्या ‘अंतरीचे गूज’ कथासंग्रहाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. ११ ः ‘‘महानगरीय उच्चभ्रू लोकांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक दुःख खूप कमी आहे. परंतु, नातेसंबंधांविषयीचे दुःख मोठे आहे. या दुःखाविषयीच्या या कथा आहेत. हा वेगळा कथाविषय पहिल्याच संग्रहात लेखिकेने हाताळल्याने तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीच पाहिजे’’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. रुचिता साहिल लिखित ‘अंतरीचे गूज’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कवयित्री अंजली कुलकर्णी, कवी-समीक्षक विश्वास वसेकर, अभ्यासक भारत सोळंके, कबीर प्रकाशनच्या प्रकाशिका रुपाली पवार-सुपेकर आदी उपस्थित होते. भालचंद्र सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. श्रीधर केतकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
पुणे, ता. ११ ः मराठीतील प्रथम ज्ञानकोश निर्माण करणाऱ्या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ८८व्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, कथाभारती आणि केतकर कुल सभेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य श्याम भुरके, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, माजी नगरसेवक श्याम सातपुते, ॲड. असीम सरोदे, माधव राजगुरू, उत्कर्ष प्रकाशनचे संचालक सु. वा. जोशी, संजय केतकर आदी उपस्थित होते. ‘‘कठीण परिस्थितीवर मात करून केतकर यांनी अमेरिकन डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यानंतर देशप्रेमाखातर ते मायदेशी परतले आणि मराठीतील पहिला ज्ञानकोश पंधरा वर्षाच्या अथक प्रयत्नांनी निर्माण केला. श्रम, ज्ञानलालसा, देशभक्ती हे गुण आपण डॉ. केतकरांचे स्मरण करताना जोपासले पाहिजेत’’, असे प्रा. जोशी म्हणाले. मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com