छतावरील खिडकी उडाल्याने शिवशाहीतील प्रवाशांना फटका
पुणे, ता. १३ ः रायगड विभागाची अलिबागहून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसच्या छतावरील खिडकी (रूफ विंडो) उडाल्याने प्रवाशांना फटका बसला. खिडकी उडाल्याने त्या बसचा प्रवास थांबवून दुसऱ्या बसने प्रवाशांना पुण्याला पाठविले. ही घटना रविवारी दुपारी घडली. दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांना सुमारे एक तास वाट पाहात थांबावे लागले.
अलिबागहून दुपारी तीनच्या सुमारास शिवशाही बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. बस खोपोलीजवळ येताच जोराचा वारा आला. त्या वेळी बसमधील एसी बंद झाला तर हवा खेळती राहण्यासाठी बसच्या छतावर हवा येण्यासाठी बनविलेली ‘रूफ विंडो’ उडाली. त्या वेळी बस थांबविण्यात आली. रायगडचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी घटनेची दखल घेत चौकशीचा आदेश दिला आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल असेही घोडे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांना पुणे गाठण्यास सुमारे दीड ते दोन तासांचा उशीर झाला. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुण्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवशाहीतील विविध समस्यांमुळे प्रवासी आधीच त्रासलेले असतात. आता त्यात खिडकी उडून जाण्याची घटना घडल्याने एसटीच्या देखभाल दुरुस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

