विधी क्षेत्रात चिकाटी गरजेची : संदीप मारणे

विधी क्षेत्रात चिकाटी गरजेची : संदीप मारणे

Published on

पुणे, ता. १५ : ‘‘अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून न्यायाधीशांसमोर खटला सादर करण्याची संधी मिळत असते. यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्यास मदत होते. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना चिकाटी असणे गरजेचे आहे. यामध्ये काम करण्यास खूप वाव आहे,’’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मारणे यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज सहावी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात पार पडली. स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, सुमंतराव कोल्हे, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अहमदखान पठाण आणि सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विकास गोगावले, जगदीश जेधे, ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी आशालता देशमुख आणि नवनियुक्त न्यायाधीश स्नेहा थोरात उपस्थित होते.

स्पर्धेत पनवेलमधील भागूबाई चंगू ठाकूर विधी महाविद्यालयाने विजेतेपद मिळवले, तर पुण्याच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळवले. युगा कुमारी (श्री शिवाजी मराठा विधी महाविद्यालय) हिला सर्वोत्कृष्ट प्रतिवादी वकील तर ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रुती चौबे हिला सर्वोत्कृष्ट वादी वकील म्हणून पारितोषिक देण्यात आले. प्रा. मीनाक्षी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली गवळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com