वसुंधरा दिनाच्या निमित्ताने 
कोरेगाव पार्कमध्ये कार्यक्रम

वसुंधरा दिनाच्या निमित्ताने कोरेगाव पार्कमध्ये कार्यक्रम

Published on

पुणे, ता. १५ : इकोएक्झिस्ट फाउंडेशन, पुनरावर्तन कलेक्टिव्ह आणि मोनाविला कलाग्रामतर्फे वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे विसर्जन झाल्यावर गोळा होणाऱ्या मातीतून विविध कलाकारांनी साकारलेल्या मूर्तींचे व मातीच्या इतर नमुन्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कोरेगाव पार्क येथे १९ ते २२ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात विविध सत्रे, कार्यशाळा व प्रदर्शनांचा समावेश आहे.
गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनानंतर ‘रीबर्थ’तर्फे पाच वर्षांपासून पुणे, पिंपरी आणि ठाणे येथे शेकडो टन माती गोळा केली जाते. या मातीतून कलाकृती साकारण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना व नागरिकांना ती मोफत दिली जाते. त्यातून निर्माण झालेल्या अनेक नवीन कलाकृती या निमित्ताने नागरिकांना पाहता येणार आहेत. विविध मूर्ती आणि स्थापत्यकलेतील नमुने तयार करण्यासाठी मातीचा पुनर्वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, हे लोकांना कळावे व कलाकारांना आपल्या कलेचे प्रदर्शन करता यावे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
संपर्क : मनीषा शेठ : ९८५००८४३८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com