पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान
पुणे, ता. १५ : भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने ३४५ व्या शिवपुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता. १३) ‘भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक छत्रपती शिवराय’ या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव सुधीर थोरात, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित होते. बलकवडे म्हणाले, ‘‘जगातील एक महान आणि आदर्श संस्कृती, अशी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. विचार आणि आचार स्वातंत्र्य हा या संस्कृतीच्या महानतेचा गाभा आहे. इथल्या समृद्धीच्या आकर्षणातून परकीयांची आक्रमणे झाली. या आक्रमकांनी लूट करून आपला देश उध्वस्त केला होता. अशा उध्वस्त भारताच्या संस्कृती, समाज आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले.’’ सूत्रसंचालन गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

